loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सव २०२५ मध्ये मराठी वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्रुती साखळकर चा ‘भाऊसाहेब वर्तक चषका’ने सन्मान

दापोली (चंद्रशेखर जोशी) : मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सव २०२५ मध्ये मराठी वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी श्रुती चंद्रशेखर साखळकर हिचा ‘भाऊसाहेब वर्तक चषका’ने सन्मान करण्यात आला. मुंबईतील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, मुंबई विद्यापीठ, सांताक्रूझ येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते श्रुतीला हा चषक प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे उपस्थित होते. विशेष म्हणजे, युवा महोत्सव २०२५ मध्ये श्रुतीने मराठी वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यासोबतच मराठी वादविवाद स्पर्धेत रजतपदक पटकावून दुहेरी यश संपादन केले होते.

टाईम्स स्पेशल

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी श्रुतीचे अभिनंदन केले. तिच्या यशासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे व साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg