वरवेली (गणेश किर्वे) - जातनिहाय जनगणना, ओबीसींचे आरक्षण व समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आज सोमवार (७ सप्टेंबर) रत्नागिरीत महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता जे. के. फाईल्ससमोरील कुणबी भवन येथे ही सभा होणार आहे. केंद्र शासनाकडून प्रस्तावित जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाची कथित फसवणूक होत असल्याचा आरोप ओबीसी जनमोर्चाने केला आहे.
तसेच राज्य सरकारकडून एका विशिष्ट समाजाला झुकते माप दिले जात असून, ओबीसींच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात ओबीसी समाजामध्ये असंतोष व नाराजीचे वातावरण असल्याचे संघटनेने म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्याने या आंदोलनात मागे राहता कामा नये, यासाठी आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सभेला कोकणातील ओबीसी जनमोर्चाचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य, ओबीसी समाजातील विविध जात संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, ओबीसी विचारवंत, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक तसेच समाजातील प्रमुख घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही सभा ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांच्या आयोजनातून होत असून, संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी सर्व संबंधितांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.