loader
Breaking News
Breaking News
Foto

खांबाळे (चव्हाटेवाडी) येथे ‘श्री आई आदिष्टी देवी डेअरी’च्या दूध संकलन केंद्राचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) - खांबाळे (चव्हाटेवाडी) येथे ‘श्री आई आदिष्टी देवी डेअरी’च्या दूध संकलन केंद्राचा शुभारंभ मंगळवारी (१ सप्टेंबर) पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या केंद्रामुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संकलनासाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाली आहे. हे केंद्र श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, कसबा वाळवे (घोणसरी–फोंडाघाट) यांच्याशी संलग्न आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांकडून नियमित दूध संकलन करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे दूध उत्पादकांना दररोजचे दूध जवळच्या संकलन केंद्रावर देण्याची सुविधा मिळणार असून, दूध व्यवसायातील दैनंदिन व्यवहार सुलभ होण्यास मदत होणार आहे. दूध व्यवसाय हा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे दूध संकलनाची नियमित व्यवस्था शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. या यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून दूध संकलन केंद्राच्या कामकाजाची माहिती घेतली. स्थानिक दूध उत्पादकांना संकलनाची सुविधा नियमितपणे उपलब्ध राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डेअरीचे चालक विक्रांत रणजीत पवार, व्यवस्थापक सचिन पाटील, अक्षय परब, निवृत्त तहसीलदार गुरुनाथ हून्नरे, पोलीस पाटील रुपेश कांबळे, माजी सरपंच गणेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष ओमकार पवार, गुरुनाथ गुरव, नारायण पवार, रामचंद्र गुरव, जयेश पवार, गितेश कडू, वैभव पवार, सुनील गुरव, गणेश गंगाराम पवार, नाना शेळके, महेश चव्हाण, संदीप पवार, उमेश पवार, सत्यवान पवार, दिनेश पालकर, शिवाजी पवार, परशुराम गुरव, प्रशांत गुरव, मंगेश सूद, प्रशांत गुरव,सचिन पवार, भरत साळुंखे, मुकेश पवार, समीर पवार, प्रविण साळुंखे, सखाराम पवार, प्रदीप पवार, दीपक हून्नरे,कमलेश पवार, सर्वेश पवार तसेच दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक सचिन पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg