loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा व्यवस्था कडक , दोन संशयित ताब्यात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गुजरातच्या बडोदामध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी पोहोचले त्यानंतर संध्याकाळी मुंबईतील एका कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती आहे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी पीएम मोदी यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेथून मुंबई क्राईम ब्रंचने सोमवारी दोघा संशयितांना ताब्यात घेतले .यामध्ये एकाकडे बंदूक आढळली तर दुसऱ्याकडे पीएमओ यांच्या कार्यालयाचे अनधिकृत ओळखपत्र सापडले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही घटना समोर आल्यानंतर चौकशी एजन्सी सतर्क झाली आहे, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले दोघांनाही 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. मुंबई पोलिसांनी असे सांगितले की ज्या दोन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामध्ये एक पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याचे सांगत आहे तर दुसरा व्यक्ती त्याच्या बॉडीगार्ड होता त्याच्याजवळ बंदूक सापडली. क्राईम शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत . कार्यालयीन माहितीनुसार पीएम यांचा कार्यक्रम निर्धारित ठिकाणी असल्याने सायंकाळी ते या ठिकाणी हजर होणार आहेत .एम मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये ग्लोबल फिनटेक पेस्ट चे उद्घाटन केले जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव रोहन पारेख असे आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पार एक जवळ एक नकली पीएम ओळखपत्र सापडले सुरक्षारक्षकांनी त्याचे वेरिफिकेशन केले असता ते नकली आढळून आले . रोहन पारीख सोबत एक बॉडीगार्ड होता ,ज्याच्यापाशी बंदूक सापडली . मुंबई पोलीस गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg