loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या ‘जान्हवी डोंगरे’ हिची उत्तेजनार्थ पारितोषिकाला गवसणी

दापोली(प्रतिनिधी)- मुंबई चर्चगेट येथील विद्यापीठ विद्यार्थी भवन येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील वक्तृत्व- गट अ (मराठी) स्पर्धेच्या अंतिम फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील एफ.वाय.बी.एस.सी. मधील विद्यार्थिनी जान्हवी आशुतोष डोंगरे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. मुंबई विद्यापीठाच्या १२ झोन मधून एकूण ५२ विद्यार्थ्यांची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंतिम फेरीसाठी ‘डीपफेक तंत्रज्ञान: सत्य, असत्य आणि समाज’ असा विषय होता. या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत जान्हवीने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सदर स्पर्धेसाठी तिला महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा.कैलास गांधी, प्रा.संतोष मराठे व साहित्य विभाग समन्वयक प्रा.तेजस मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर प्रा.विश्वेश जोशी व प्रा.अनिरुद्ध सुतार यांनी संघ समन्वयक म्हणून काम पाहिले. या कामगिरीबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.घनशाम साठे तसेच इतर सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg