loader
Breaking News
Breaking News
Foto

डिजिटल युगातही गणपती भिंत रंगविण्याच्या कलेची परंपरा कायम

सावंतवाडी : सध्या गणेशोत्सवाचे वेध लागले असून गणेश चतुर्थी काही दिवसांवर आल्याने सगळीकडे जय्यत तयारी सुरू झाली असून कलाकार आपल्या कामात व्यस्त आहेत. गणपती भिंत रंगविण्याची पूर्वापार पारंपारिक कला आजची या डिजिटल तंत्रज्ञानाचा युगात आपली वेगळी ओळख ठरत आहे. आता सगळीकडे गणेशोत्सवाचे वेध लागले असून गणेश चतुर्थी काही दिवसांवर आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून विविध क्षेत्रातील कलाकारही आपल्या कामात व्यस्त झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या तयारीत "गणपतीची भिंत" रंगविण्याची पूर्वापार चालत आलेली पारंपरिक कला आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातही आपली वेगळी ओळख टिकवून आहे. संगणक, डिजिटल प्रिंटिंग आणि आधुनिक सजावटीच्या साधनांचा वापर वाढला असला, तरी हाताने भिंतीवर " गणपतीच्या भिंतीवर" चित्र साकारण्याची कला आजही अनेकांच्या पसंतीस उतरते. पूर्वी गावोगावी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांकडून भिंतीवर आकर्षक , विविध धार्मिक प्रसंग तसेच निसर्गचित्रे रंगविली जात. या चित्रांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिक खुलून दिसत असे.

टाईम्स स्पेशल

आजही अनेक कलाकार ही परंपरा जपत असून गणेशोत्सवापूर्वी त्यांना भिंत रंगविण्याची कामे मिळत आहेत. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही कलेतील हातोटी, कल्पकता आणि पारंपरिक शैलीचे महत्त्व कमी झालेले नाही, हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिसून येत आहे. त्यामुळे आधुनिकतेसोबतच पारंपरिक कलेचा वारसाही जपला जात असल्याचे चित्र आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg