loader
Breaking News
Breaking News
Foto

वेतोशीच्या कातळावर ज्या ठिकाणी गोवंश हत्येचे पुरावे सापडले होते त्याच ठिकाणी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता दोघांच्या मुसक्या आवळल्या; तिसरा फरार

रत्नागिरी(वार्ताहर) - ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी वेतोशीच्या कातळावर गोवंश हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्याच ठिकाणी काही संशयित गोवंश हत्या करतानाचा प्रत्यक्ष प्रकार उघडकीस आल्याने रत्नागिरी परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांकडून संतापाची भावना व्यक्त होत आहे. रत्नागिरी वांद्री मार्गावर वेतोशी येथे गोवंश हत्या आणि तस्करीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. मध्यरात्री पोलिसाची गस्त सुरू असताना वेतोशी सड्यावर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी आपली गाडी थांबवून आणि बॅटरीच्या प्रकाशात सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींकडे लक्ष वेधले. त्यावेळी चार तरुण गोवंश हत्या करीत असावेत असा संशय बळावल्याने पोलिसांनी शिताफिने चारही बाजूंनी आरोपींना घेरण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यातूनच पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना इन्होवा कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी झटापटीत दोघांच्या मुसक्या आवळल्या. तिसरा आरोपी संशयित पोलिसांनी तावडीतून पसार झालाय. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. फणसवळे -वेतोशी मार्गावर प्रत्यक्ष ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र पालवे यांचेसह पोलिस कॉन्स्टेबल संकेत महाडीक, सागर साळवी, चालक तेरवणकर यांनी प्रत्यक्ष गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या करताना रंगेहाथ पकडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण पोलिस निरीक्षक पालवे यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. जीवाची पर्वा न करता एकाला पकडले आणि दुसरा झाडीत लपलेला त्यालाही पकडण्यात आले आहे. ही घटना बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी यांनी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे. सरपंच निलेश लोंढे, तंटामुक्ती समितीचे माझी अध्यक्ष संतोष आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पवार, ऋतुजा आंबेकर सकाळी पंचनामावेळी उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी या तिघांच्य मुसक्या आवळून असे प्रकरण पुन्हा घडू नये म्हणून अद्दल घडवावी आणि कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. ग्रामीण पोलिस स्थानक रत्नागिरीच्या पोलिस पथकाने केलेल्या कारवाईबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg