loader
Breaking News
Breaking News
Foto

सीमा घरत भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी उरण येथील सीमा अनंत घरत यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या नियुक्तीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्तारामध्ये महिला मोर्चाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना, महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासोबतच महिलांच्या समस्या व प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर सीमा घरत यांच्यावर उत्तर रायगड जिल्ह्यातील महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उरण परिसरात सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सीमा घरत यांना पक्षाने दिलेल्या या जबाबदारीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सीमा घरत यांच्या नियुक्तीबद्दल माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, उरण तालुका सचिव सुनील पाटील, महिला अध्यक्ष राणीम्हात्रे, सचिव शमिता ठाकूर, आर्चीत घरत, भगवान घरत, तालुका चिटणीस बळीराम घरत, जासई गाव अध्यक्ष सुनील घरत, दत्तात्रेय ठाकूर आदी मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg