loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी समृद्धी घाणेकर हिची निवड

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थीनी समृद्धी घाणेकर हिची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रथम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महाविद्यालय विद्यार्थी मंडळाची नियुक्ती मुंबई विद्यापिठाच्या यापूर्वीच्या परिपत्रकानुसार करण्यात आली. या विद्यार्थी मंडळात गतवर्षी गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून सर्व उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थ्यांना विविध वर्गाच्या प्रमुखपदी तसेच विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यानुसार प्रथम वर्ष कला वर्गप्रतिनिधी चव्हाण संजना संतोष, प्रथम वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी बेटके प्रणव प्रमोद, द्वितीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी रोहीलकर वसुंधरा विलास, द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी बेटके प्रणय प्रमोद, तृतीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी भुवड समीक्षा रमेश, तृतीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी साल्हे सामिया मुस्तफा यांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयातील क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जाधव राजेश, एनएसएस विभाग प्रतिनिधी म्हणून घाणेकर समृद्धी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी म्हणून पारदळे साक्षी यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य प्रतिनिधी म्हणून तृतीय वर्ष कला वर्गातील चव्हाण दीक्षा विनोद तर तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विचारे जान्हवी प्रफुल्ल यांची नियुक्ती करण्यात आली. घाणेकर समृद्धी सिताराम हिने विद्यार्थी मंडळाच्या प्रमुखपदी राहण्याची इच्छा व्यक्त केली असता सर्व प्रतिनिधींनी तिला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. देसाई यांनी घाणेकर समृद्धी हिची विद्यार्थी मंडळ सचिवपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले.

टाईम्स स्पेशल

महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सर्व विद्यार्थी सहभागी होतील यासाठी विद्यार्थी मंडळाने प्रयत्न करावेत, सर्वाना विविध कार्यक्रमामध्ये सामावून घ्यावे आणि महाविद्यालयाचे विविध समित्यांवर जे विद्यार्थी प्रतिनिधी नेमले जातील त्यांनी त्या त्या समितीचे काम योग्य पद्धतीने होईल यासाठी मदत करावी, असे मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. देसाई यांनी विद्यार्थी मंडळाच्या सचिव तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधीना शुभेच्छा दिल्या. यासर्व प्रक्रियेत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे आणि डॉ. जालिंदर जाधव सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg