loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ तायक्वांदो स्पर्धेत नायशी हायस्कुलची आराध्या चव्हाण प्रथम

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चिपळूण तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२६/२७ च्या तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाची मानकरी १४ वर्षे वयोगटातून ह. भ. प. श्री. आ.बा सावंत माध्यमिक विद्यालय, नायशी ता. चिपळूण या विद्यालयाची इयत्ता ७ वीची गुणवान विद्यार्थिनी आराध्या संभाजी चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक (Gold Medal) प्राप्त केले. सदरची स्पर्धा बांदल हायस्कूल चिपळूण येथे संपन्न झाली. ग्रामीण भागातील शिकणारी आराध्या ही जीद्दी असून, पालक व शाळा तिला मार्गदर्शन करत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. ‌आराध्याच्या या यशामुळे संपूर्ण विद्यालयाचे तसेच पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल झाले असून, परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या ह्या यशात तिच्या परिवाराचा मोलाचा वाटा आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg