loader
Breaking News
Breaking News
Foto

कुवेतील तीन गणेशोत्सव मंडळांचा ‘डीजे-मुक्त’ गणेशोत्सवाचा संकल्प

केळंबे-लांजा: (सिराज नेवरेकर) - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुवे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची गुरुवारी (१० सप्टेंबर) रोजी झालेल्या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव शांततेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून डीजे मुक्त साजरा करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. बैठकीस एकूण १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. शासन तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार यंदाचा गणेशोत्सव डीजे-मुक्त पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मंडळांच्या पदाधिकार्‍यांना करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कुवे गावातील ३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजे-मुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे लेखी पत्र बैठकीदरम्यान सादर केले. सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेमुळे बैठक शांततेत पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg