loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवापूर्वी वीजव्यवस्था सुरळीत करा; लवू नाईक

तिलारी(प्रतिनिधी) : कोनाळकट्टा येथील विद्युत वाहिनीवरील खराब झालेला एबी स्विच तातडीने दुरुस्त अथवा बदलावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे दोडामार्ग तालुका चिटणीस लवू नाईक यांनी महावितरणकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढणार असून, वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेने आवश्यक ती कार्यवाही गणेश चतुर्थीपूर्वी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

तसेच वायंगणताड गावातील आवश्यक ठिकाणी ३ नवीन विद्युत पोल बसवावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी महावितरणने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी लवू नाईक यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg