loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम हायस्कूल हर्णै -पाजपंढरीमध्ये शिक्षक दिन उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) : दापोली एज्युकेशन सोसायटी दापोली संचलित श्रीराम हायस्कूल हर्णै -पाजपंढरीमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन घुले, विद्यार्थी मुख्याध्यापिका समीक्षा भोईनकर, ज्येष्ठ शिक्षिका- मीनाक्षी नागदिवे, राजेश महाडिक, दिगंबर पावसे, मोहन पडवेकर, ओंकार बेडेकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिका बनवून शाळेचे कामकाज पाहिले. विद्यार्थी शिक्षकाने आपले आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले तर शिक्षकांपैकी मीनाक्षी नागदिवे व मोहन पडवेकर यांनी आपल्या गुरुजनांविषयी आदर व्यक्त करत शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाध्यक्ष अर्जुन घुले यांनी ' समाजात शिक्षकांना असलेले मानाचे स्थान आणि शिक्षकाची जबाबदारी' याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. अतिशय उत्साहात पार पडलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिगंबर पावसे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg