loader
Breaking News
Breaking News
Foto

सांगेली, सावरवाड येथील भरारी महिला ग्राम संघाची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव; दारू विक्री बंद न झाल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सांगेली, सावरवाड येथील भरारी महिला ग्राम संघाने जिल्हा पोलीस प्रमुख मोहन दहिकर यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन कैफियत मांडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दारू विक्री व्यवसाय करून दहशत माजवणार्‍या व्यक्तींवर तडीपाराची कारवाई करावी. ही कारवाई दोन ऑक्टोबरपर्यंत न झाल्यास आम्ही सर्व भरारी महिला ग्राम संघ जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. अध्यक्षा सुप्रिया पंढरीनाथ मडगावकर, सरपंच देवयानी पवार, सविता ठाकूर, लक्ष्मी गावडे, धनश्री पवार, सुनीता लाड, मानसी पवार, सुवासिनी न्हावी, स्नेहा कुडतरकर आदी महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.

टाईम्स स्पेशल

गेल्या तीन-चार वर्षांपासून भरारी महिला ग्राम संघ कलंबिस्त, सावरवाड भागातील दारू व्यसनापायी बळी पडलेल्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी धडपडत आहे. या पंचक्रोशीतील वैध-अवैध असे सर्वच दारू धंदे बंद करावेत आणि ही पंचक्रोशी दारूमुक्त करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg