loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत श्रीराम विद्यालयाच्या ‘चूक कोणाची?’ नाटिकेला द्वितीय क्रमांक

लांजा (प्रतिनिधी) : पंचायत समिती लांजा, शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत श्रीराम विद्यालयाने दैदिप्यमान कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयाच्या ’चूक कोणाची?’ या नाटकाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर हा बहुमान मिळवला असून, या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक आणि विज्ञान विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या नाटकाच्या संकल्पना व दिग्दर्शनाची धुरा विज्ञान शिक्षक प्रदीप लाड व श्री. बंडगर यांनी सांभाळली, तर लेखक श्रुतीक प्रभुलकर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांच्याकडून उत्तम तयारी करून घेतली. तसेच ज्येष्ठ सिने अभिनेते अमोल रेडीज यांचे मुख्य मार्गदर्शक म्हणून विशेष सहकार्य लाभल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिकच द्विगुणीत झाला. या यशामुळे श्रीराम विद्यालय व परिसरातून सर्व विजेत्या विद्यार्थ्यांवर आणि मार्गदर्शक शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg