loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळेत दहीहंडी उत्साहात संपन्न

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. चार हंड्या फोडण्यात आल्या. विशेष म्हणजे या हंड्या तीन थरापेक्षा ऊंच बांधायच्या नाहीत असा नियमच करून ठेवलेला असल्याचे शिवू शेट्ये यांनी सांगितले. देवळे येथील करकरे यांच्या श्रीकृष्ण मंदिरातून श्रीकृष्णाची मूर्ती उत्सवानंतर विसर्जन केले जाते. त्याची मिरवणूक, हंडी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो. सुरुवातीला खडगेश्वर मंदिर समोर दहीहंडी फोडण्यात येते. त्यानंतर बाजारपेठेतील पुढील हंड्या फोडण्यात येतात. या दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम व कृष्ण मूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम हा आगळावेगळा असतो. पंचक्रोशीतील उत्साही मंडळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी व दहीहंडी फोडण्यासाठी खूप गर्दी केली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg