loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत गौरी-गणपती सण पारंपारिक आणि शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन; डीजेवर पूर्ण बंदी

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - आगामी गौरी-गणपती सण पारंपारिक पद्धतीने आणि शांततेत साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आयोजित गणेश मंडळ, व्यापारी, रिक्षा युनियन, अधिकारी आणि शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ​बैठकीत बोलताना पोलीस उपअधीक्षक दिपक शेलार व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डीजेमुळे वयोवृद्धांना त्रास होत असल्याने बंदीचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश पोलीस निरीक्षक मगदूम यांनी दिले. तसेच शहरातील अरुंद रस्ते लक्षात घेता बाजारपेठेत अवजड व मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. प्रवासी नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​वाहतूक व पार्किंग व्यवस्थेबाबत नगरपरिषद सभापती प्रतीक बांदेकर यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची व विक्रेत्यांची सोय व्हावी म्हणून आर. पी. डी. हायस्कूल पटांगण आणि जिमखाना मैदानावर पार्किंगचे नियोजन केले जात आहे. अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. ​या वेळी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी दिली. चाकरमान्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी एसटी महामंडळ आणि कोकण रेल्वेच्या वतीने अतिरिक्त बसेस व सेवा पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे आगार व्यवस्थापक गौतमी कुबडे व रेल्वेचे मधुकर मातोंडकर यांनी सांगितले.शहरात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड तैनात केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले तर हवालदार अमित राऊळ वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्था स्पष्ट केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध राहतील अशी खबरदारी घेतली पाहिजे याकडे पत्रकार सिताराम गावडे यांनी लक्ष वेधले.

टाईम्स स्पेशल

मुंबईहून खाजगी बसेस येणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी शहरात उतरले जाईल अशी खबरदारी घेतली पाहिजे असे पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी सांगितले तसेच रेल्वे स्थानकावरून बांदा व दोडामार्ग पर्यंत एसटी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच चाकरमानी शहरात येण्यासाठी बस सुविधा देण्याची मागणी लोंढे यांनी केली. ​या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, नगरपरिषद सभापती आनंद नेवगी, पत्रकार सिताराम गावडे, रिक्षा युनियनचे सुधीर पराडकर, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, नगरपरिषदेचे गजानन परब, आगार व्यवस्थापक गौतमी कुबडे, कृष्णा धुळपनवार, संकल्प धारगळकर, विश्वास घाग, विनायक पिंगुळकर प्रमोद मोडक शांबा म्हापसेकर रूपेश पवार शैलेश मेस्त्री हिदायततुल्ला खान ऑगोस्तीन फर्नांडिस राघवेंद्र चितारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg