loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई–सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आजपासून सुरू, आठवड्याचे सातही दिवस धावणार

मुंबई - कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड–मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या नव्या दैनिक एक्सप्रेसचे नियमित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर मध्य रेल्वेने Coaching Notification No. 784/2026 जारी केली आहे. गाडी क्र. १५०८७ मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड ही मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ पासून, तर गाडी क्र. १५०८८ सावंतवाडी रोड–मुंबई सीएसएमटी ही बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ पासून नियमित धावणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवीन एक्सप्रेसला तुतारी एक्सप्रेसच्या धर्तीवर कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकणातील प्रवाशांना दैनंदिन प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. या एक्सप्रेसमध्ये एकूण २३ LHB डबे असतील. त्यामध्ये १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ४ स्लीपर, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ पॅन्ट्री कार, १ जनरेटर कार, १ दिव्यांगजन व लगेज व्हॅन आणि १ पार्सल व्हॅनचा समावेश आहे. या गाडीचा रेक १२५३३/१२५३४ गोमतीनगर–मुंबई पुष्पक एक्सप्रेससोबत Integrated Rake Link पद्धतीने जोडण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

नवीन गाडीच्या संचालनामुळे ८ सप्टेंबरपासून मुंबई सीएसएमटी येथे येणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १२१०६ गोंदिया–मुंबई विदर्भ एक्सप्रेस : सकाळी ६.५० ऐवजी ७.०० वाजता आगमन. १२८६० हावडा–मुंबई गीतांजली एक्सप्रेस : रात्री ९.२० ऐवजी १०.४५ वाजता आगमन. १२५३३ गोमतीनगर–मुंबई पुष्पक एक्सप्रेस : रात्री १०.४५ ऐवजी ९.२० वाजता आगमन. मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह नियमित प्रवाशांसाठी ही दैनिक एक्सप्रेस सेवा मोठी दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः सावंतवाडी परिसरातील प्रवाशांना मुंबईकडे ये-जा करण्यासाठी नियमित रेल्वेसेवेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg