loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली डेपोची ’ई-शिवाई’ बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

संगलट - मंडणगडहून दापोलीकडे येणारी ई-शिवाई एसटी बस दापोली ते मंडणगड महामार्गावरील खोडा परिसरात पेट्रोल पंपाजवळ येवून बस ब्रेक डाऊन झाली. दापोली डेपोतून धावणारी ई-शिवाई एसटी बस अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या या इलेक्ट्रिक बसमध्ये ऐन प्रवासात बिघाड होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, बस वारंवार बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडत असून पर्यायी व्यवस्था लवकर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एसटी प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती दुरुस्ती करावी आणि प्रवाशांना सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg