loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई विद्यापीठाच्या भारतीय समूह गीतगायन अंतिम फेरीत पाटपन्हाळे महाविद्यालयातील विद्यार्थाचे यश

आबलोली (संदेश कदम) - मुंबई व्द्यिापीठाने आयोजित केलेल्या ५९ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२६-२७ ची भारतीय समूह गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई व्द्यिापीठ, ग्रीन टेक्नोलोजी ऑडीटोरीयम हॉल, विद्यानगरी कलिना, सांताक्रूझ (पूर्व) येथे नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धेत मुंबई विद्यापीठातील एकूण ३४ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने ’हिंदोस्ता हमारा’ या भारतीय समूह गीतगायनाचे सादरीकरण केले. सदर स्पर्धेत महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विद्याथांनी मिळविलेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg