संगमेश्वर (सत्यवान विचारे) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमेश्वर शाखेच्या वतीने आयोजित हिंदुहृदयसम्राट दहीहंडी उत्सव २०२६ उत्साह, जल्लोष आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. या उत्सवातील मानाची दहीहंडी श्री निनावी देवी गोविंदा पथकाने फोडत विजेतेपद पटकावले. विविध गोविंदा पथकांच्या थरारक मानवी मनोऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते संगमेश्वर महिला गोविंदा पथकाचे दमदार सादरीकरण. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची आणि उत्साहाची झलक दाखवून उपस्थितांची दाद मिळवली. दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी मैदानात उतरत मानवी मनोरे रचले. गोविंदांच्या घोषणांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमून गेला. सहभागी पथकांचा रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्सवाला जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर, कोंडगाव पंचायत समिती सदस्य तांदळे, नावडी अल्पसंख्याक विभागप्रमुख रईस अलजी, नावडी उपविभागप्रमुख नथुराम पडवळ, ज्येष्ठ शिवसैनिक तथा मौजे असुर्डेचे सरपंच प्रदीप शिंदे, महिला आघाडी विभाग संघटिका प्रिया सावंत, शाखा संघटिका संगीता जंगम, सुजाता पाताडे आदींसह अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
संगमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये, खजिनदार उदय संसारे, सदस्य जनार्दन शिरगांवकर, विनय मुरकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख वैभव मुरकर, उपविभागप्रमुख सिद्धेश सावंत, माजी शाखाप्रमुख सूरज सुर्वे तसेच संगमेश्वर शाखेतील शिवसैनिकांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. रविंद्र डोळस यांनी गोविंदा पथकांच्या संयम, निष्ठा आणि कौशल्याचे कौतुक केले. प्रकाश घाणेकर यांनी महिला व बालगोविंदांच्या सहभागाचे विशेष अभिनंदन केले. उत्सवात संगमेश्वर बॉइज गोविंदा पथक, श्री विरोबा गोविंदा पथक कुंभारवाडी-कसबा फणसवणे, राधाकृष्ण गोविंदा पथक साखरकोंड, संगमेश्वर महिला मंडळ गोविंदा पथक, स्मार्ट बॉइज गोविंदा पथक आणि श्री निनावी देवी गोविंदा पथक यांनी सहभाग घेतला.
महिलांसाठी यावेळी विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. डोळ्यांवर पट्टी बांधून काठीच्या सहाय्याने हंडी फोडण्याच्या अनोख्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आकर्षक बक्षिसांमुळे महिलांचा उत्साह आणखी वाढला. गाण्यांच्या तालावर महिलांनी मनसोक्त नृत्य करत या उपक्रमाचा आनंद घेतला. दहीहंडी उत्सवामुळे संगमेश्वर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर शाखेच्या शिवसैनिकांनी विशेष मेहनत घेतली.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.