रत्नागिर - संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी सरपंच सचिन शांताराम चव्हाण यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) अन्वये सरपंच पदावरून बडतर्फ केले आहे. दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी हा अंतिम आदेश निघाला आहे. ग्रामस्थ विजय तुकाराम चव्हाण यांनी १५व्या वित्त आयोगात ९ लाखांचा अपहार झाल्याची तक्रार केली होती. त्यावर गटविकास अधिकारी संगमेश्वर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी यांनी सखोल चौकशी केली.
१. रु. ८५,००४ चा थेट अपहार: २०२४-२५ मधील शेवट करंडा येथे पाखाडी बांधणे हे काम जागेवर झालेच नाही. त्याचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका दफ्तरी नाही, तरीही पूर्ण पेमेंट दिले. २. साहित्य गायब: १५ व्या वित्त आयोगातून ६०० कचराकुंड्या खरेदी दाखवल्या, पण वाटप ४७२ चे दाखवले. १२८ कुंड्या कुठे गेल्या? हिशेब नाही. तसेच ५८ खुर्च्यांपैकी २० चेच वाटप, ३८ खुर्च्या गायब. कोणत्याही साहित्याची साठा नोंदवही (नमुना नं. १५) मध्ये नोंद नाही. ३. नियम डावलले: शासन निर्णय दि. ४ नोव्हेंबर २०१५ नुसार जीपीडीपी आराखड्यातील काम बदलताना सीईओ, जि.प.ची लेखी मान्यता घेणे बंधनकारक आहे. ती न घेता ग्रामसभेचा ठराव दाखवून परस्पर कामे बदलली. कळंबुशी बौद्धवादी येथील पाखाडी फक्त कागदावर काम दाखवलं भलतंच तसेच सौर पथदिवे जीईएम पोर्टलवरून खरेदी करणे बंधनकारक असताना बोगस पेपर निविदा दाखवून लाखोंची खरेदी केली. जागेवर काहीच नाही. ४. कागदपत्रेच गायब: पाखाडी बांधणे, फर्निचर, पाणी योजना अशा अनेक कामांचे मागणीपत्र, कार्यारंभ आदेश, मूल्यांकन दफ्तरीच नाही.
चौकशी अहवालानुसार रु. १,९७,४५४ चा थेट अपहार, रु. १,१६,६८१ चा संशयित अपहार आणि सुमारे रु. ९. लाखांपेक्षा जास्त प्रशासकीय व आर्थिक अनियमितता सिद्ध झाली आहे. सरपंचांचा गावाच्या हितासाठी कामे बदलली, हा गुन्हा नाही फक्त अनियमितता आहे हा युक्तिवाद आयुक्तांनी फेटाळला. कलम ५७(३) नुसार ग्रामनिधीची जबाबदारी सरपंचांचीच असल्याने त्यांना दोषी धरले. आदेशात सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक संदीप शेडगे यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. बुरंबाड पाठोपाठ कळंबुशी - संगमेश्वर तालुक्यात आयुक्तांची दुसरी मोठी कारवाई.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.