loader
Breaking News
Breaking News
Foto

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट

मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मंत्री नितेश राणे यांनी पवार यांना दिली. तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ची माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला अधिक चालना देणे, मच्छीमार बांधवांच्या हितासाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच बंदरांच्या विकासाला गती देण्यासाठी शासनामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg