loader
Breaking News
Breaking News
Foto

दारूच्या नशेत बिअर शॉपीबाहेर धिंगाणा, 40 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा - बाणकोट सागरी पोलिसांची कारवाई

खेड - मंडणगड तालुक्यातील बाणकोट सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्मिकीनगर येथे दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव - केतन विलास सपकाळ (वय ४०, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी वाल्मिकीनगर येथील भाटकर यांच्या मालकीच्या सरकारमान्य बिअर शॉपीबाहेर एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत हेलकावे खात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या व्यक्तीला व्यवस्थित उभे राहता येत नव्हते. तसेच त्याच्या तोंडातून दारूचा तीव्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित व्यक्तीने मद्यप्राशन केले असल्याचा संशय पोलिसांना आला.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी पोलीस नाईक राहुल बसवराज माने यांनी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तातडीने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली.वैद्यकीय तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीने मद्यप्राशन केले असून तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई करत बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg