loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव, गावांचे नामफलक, किलोमीटर फलकासह बसथांब्यांची मागणी

संगलट (इक्बाल जमादार) - किल्ले रायगडकडे जाणारा मुख्य मार्ग नव्याने तयार झाल्याने प्रवास अधिक सुकर झाला असला, तरी या मार्गावरील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले; मात्र रस्त्यालगत असलेल्या गावांची नावे दर्शविणारे नामफलक अनेक ठिकाणी फाटलेले, जीर्ण झालेले अथवा पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना गावांची ओळख पटविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. किल्ले रायगडाला भेट देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. नव्या रस्त्यामुळे प्रवासाचा दर्जा सुधारला असला, तरी मार्गावरील दिशादर्शक फलक, गावांचे नामफलक आणि किलोमीटर दर्शविणारे फलक नसल्याने वाहनचालक व पर्यटकांची गैरसोय होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः प्रथमच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना कोणते गाव किती अंतरावर आहे, रायगड किती किलोमीटरवर आहे किंवा कोणत्या फाट्यावरून कोणत्या गावाकडे जाता येते, याची माहिती मिळणे कठीण होत आहे. या मार्गावर किलोमीटर फलक तसेच प्रत्येक महत्त्वाच्या फाट्यावर स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली नवा रस्ता तयार झाल्यानंतर त्याला आवश्यक असलेल्या पूरक सुविधाही तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. गावांचे नामफलक, किलोमीटर फलक, दिशादर्शक फलक आणि बसथांबे उभारून किल्ले रायगड मार्ग अधिक पर्यटकस्नेही व सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

टाईम्स स्पेशल

फलकांवर गावाचे नाव, किल्ले रायगडाचे अंतर आणि जवळच्या प्रमुख ठिकाणांची माहिती देण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. याशिवाय मार्गावरील गावांतील नागरिकांसाठी बसथांबे उभारण्याचीही मागणी जोर धरत आहे. सध्या अनेक ठिकाणी प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे सुरक्षित व नियोजनबद्ध बसथांबे उभारणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg