loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडीवली तंटामुक्त गाव अध्यक्षपदी ‘खलील अली पोत्रिक’ यांची एकमताने निवड!

खेड : खेड तालुक्यातील कोंडीवली गावच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी खलील अली पोत्रिक यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहमतीने झालेल्या या निवडीमुळे गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि एकोपा राखण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खलील अली पोत्रिक यांची तंटामुक्त गाव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोंडीवली गावच्या सरपंच शीला प्रकाश कोंडविलकर, पोलीस पाटील सिद्धार्थ कापसे, ग्रामसेवक संध्या चाळके, उपसरपंच सुगंधी कैलास शिंदे, अशोक कोंडविलकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

गावातील विविध तंटे व वाद सामंजस्याने सोडवून गावात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष खलील अली पोत्रिक यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांच्या निवडीचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg