loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे 16 आदर्श शिक्षकांचा 'आदर्श गुरुवर्य' पुरस्काराने गौरव

खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श गुरुवर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी शिक्षक हे शैक्षणिक क्षेत्रात पवित्र दानाचे कार्य अविरतपणे करत असून अध्यापनात नाविन्यपूर्ण प्रयोग, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे शिक्षक हेच समाजाचे खरे दीपस्तंभ आहेत, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - अल्ताफ मुसा करबेलकर - एम.आय.बी. गर्ल हाय. अँड ज्युनि. कॉलेज खेड, मेहजबीन परवेज महाडिक- एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल खेड, विनोद सुधाकर टेंबे - ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव, हसनमियां रिफाई - हाजी एस.एम. मुकादम हायस्कूल खेड, रामचंद्र विठ्ठल मसेकर - एल.पी. इंग्लिश स्कूल खेड, विलास सदानंद बेंद्रे - नवभारत हायस्कूल भरणे, आनंद सोमय्या हिरेमठ - छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे, विवेकानंद गोविंद कांबळे - श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड, सागर प्रमोद मोरे - एस.एम. इंग्लिश मीडियम स्कूल दस्तुरी, शितल सलील जागुष्टे - एल.टी.टी. इंग्लिश मीडियम स्कूल खेड, राजेश रघुनाथ भागणे - जि.प. शाळा, साखरोळी मोरेवाडी, रसिका रमेश रेवाळे - जि.प. शाळा, आंबवली, भक्ती काशिनाथ घडशी - श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम वेरळ, बाळू दत्तात्रय राऊत - रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड, प्रतिक परशुराम पवार - ज्ञानदीप इंग्लिश मीडियम मोरवंडे बोरज, स्मिता प्रकाश सरदेसाई - विश्वनाथ विद्यालय, लवेल

टाईम्स स्पेशल

तसेच सामाजिक संस्थेत कार्यरत राहून शिक्षकी पेशात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे, विद्यमान सचिव ला. उत्तम कांबळे आणि माजी खजिनदार ला. अनिल मोरे यांना विशेष आदर्श गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्काराचे पुरस्कर्ते ला. सुरेश चिकणे आणि ला. उत्तम कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ला. पंकजभाई शहा, शमसभाई मुकादम, ला. हनीफभाई घनसार, ला. मिलिंद तलाठी, माजी प्रांतपाल ला. वीरेंद्र चिखले, मुख्याध्यापिका तिसेकर यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. सुरेश चिकणे व ला. उत्तम कांबळे यांनी केले तर आभार ला. अनिल मोरे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg