loader
Breaking News
Breaking News
Foto

झोळंबेचे माजी सरपंच सतीश कामत यांचे निधन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - झोळंबे गावचे माजी सरपंच, तसेच तळकट-झोळंबे सहकारी सोसायटीचे माजी संचालक आणि सावंतवाडी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक सतीश यशवंत कामत यांचे मंगळवारी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने झोळंबे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सतीश कामत यांनी झोळंबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी योगदान दिले होते. तसेच सहकार क्षेत्रातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते ‘आत्मा’ समिती, दोडामार्गचे माजी सदस्य होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्यावर आज बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg