loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई ते वेळास एस.टी. बसेस वेळास पर्यंत नेण्यात याव्यात, मुंबई वासीयांची मागणी

मंडणगड ( प्रतिनिधी ) - मुंबई सेंट्रल येथून सुटणार्‍या आणि मंडणगड तालुक्यातील वेळास येथे जाणार्‍या एसटी बसेस मागील दोन वर्षापासून वेसवी बौद्धवाडी पर्यंतच नेण्यात येत आहेत. त्यामुळे वेसवी ते वेळास दरम्यानच्या अंतरातील परिसरातील गाव वाड्यातील प्रवाशांना आपल्या गावापासून दूर असलेल्या वेसवी इथून पुन्हा खाजगी वाहनानेच आपल्या घरापर्यंत जावे लागते. याचा मानसिक ताप तर प्रवाशांना सहन करावा लागतोच आहे शिवाय मोठा आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागतो आहे. त्यामुळे मुंबई वेळास नाव असलेली आणि शेवटचे ठिकाण असलेल्या वेळास गावापर्यंत पुर्ववत सुरू असलेल्या एस. टी. बसेस या वेळास पर्यंत नेण्यात याव्यात यासाठी शिवसेना मंडणगड तालुका संघटनेचे बाणकोट मुंबई विभाग प्रमुख सुनील भानसे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुंबई सेंट्रल आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांची त्यांच्या मुंबई सेंट्रल एस.टी. स्थानक कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भात लेखी निवेदन पत्र देऊन मागणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg