loader
Breaking News
Breaking News
Foto

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात! बालगोपाल मंडळींनी फोडली दहीहंडी; कृष्णलीलांवर आधारित गीत-नृत्याने रंगली गोकुळाष्टमी!

सावंतवाडी - यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहिल्याने शाळेच्या परिसरात गोकुळनगरीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कृष्णाच्या जीवनावर आधारित समूहगीत, गाणी आणि नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी थरावर थर रचत दहीहंडी फोडली. त्यानंतर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनीही उत्साहात दहीहंडी फोडत गोकुळाष्टमीचा आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फूर्त घोषणा आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा ऍड. डॉ. अस्मिता सावंत भोसले, सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस, इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg