केळंबे-लांजा (वार्ताहर) - शहरातील लांजा-साटवली मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनधिकृत खोक्यांविरोधात लांजा नगरपंचायत प्रशासनाने मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या उपस्थितीत कारवाई केली असून कारवाईत अनधिकृत खोके हटविल्यानंतर सदर रस्ता वहातूकीला अडथळा न होता मोकळा झाला असल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. लांजा-साटवली मार्गावरील असलेल्या अनधिकृत खोक्यांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याचे तक्रारी अर्ज नगरपंचायतीला प्राप्त झाले होते. तसेच याच मार्गावर असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही अतिक्रमणाविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या.
तर या मार्गावरील रस्त्यालगत हातगाड्यांवर दुपारपासून संध्याकाळच्या वेळेस खवय्यांची मोठी गर्दी होत असे. हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असून वारंवार वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अखेर नगरपंचायतीकडून खोके हटविण्याची कारवाई करण्यात आली. अतिक्रमणे काढण्यात आलेल्या रस्त्यालगतच्या जागेत यापूर्वी १३ अनधिकृत खोके होते. त्यापैकी वापरात नसलेले चार खोके नगरपंचायतीने महिनाभरापूर्वीच हटविले होते. उर्वरित नऊ खोकेधारकांना नगरपंचायतीकडून जुलै महिन्यात नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही खोके कायम असल्याने २५ ऑगस्ट रोजी पुन्हा नोटीस बजावून ४८ तासांच्या मुदतीत अनधिकृत खोके हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
अखेर मुदत संपल्यानंतर सोमवारी नगरपंचायतीच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. कारवाईदरम्यान सहा खोकेधारकांनी स्वतःहून आपले खोके हटविले तर उर्वरित तीन खोके नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी हटविले. दरम्यान. या कारवाईवेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, प्रभारी नगरअभियंता रणवीर कोकरे-देसाई, नगररचना सहायक सुचेत बन्ने, लिपिक संजय गुरव, संतोष आगरे यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईबाबत जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.