loader
Breaking News
Breaking News
Foto

मडुरा तंटामुक्ती अध्यक्षपदी ‘जगन्नाथ परब’ यांनी मारली बाजी!

बांदा(प्रतिनिधी)- मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत जगन्नाथ महादेव परब यांनी बाजी मारली. प्रतिस्पर्धी उमेदवार राजाराम केरकर यांचा त्यांनी ३५ विरुद्ध १५ मतांनी पराभव केला. सरपंच उदय चिंदरकर यांनी नूतन अध्यक्ष जगन्नाथ परब यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मडुरा ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सरपंच उदय चिंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली मडूरा आरोग्य उपकेंद्राच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसरपंच कृष्णा गावडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली परब, माजी सरपंच साक्षी तोरसकर, माजी उपसरपंच उल्हास परब, आरोग्य अधिकारी डॉ. दीपिका वराडकर, पशुवैद्यकीय अधिकारी ए. एस. शिरसाट, पोलीस पाटील नितीन नाईक, ग्रामविकास अधिकारी प्रसाद ठाकूर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी विविध विकासकामे, गावातील प्रलंबित प्रश्न यावर चर्चा झाली. डॉ. वराडकर यांनी आरोग्य विषयक समितीची माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी शिरसाट यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासनाच्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेची विस्तृत माहिती दिली. यावेळी केशव परब, पिंटो परब, प्रितेश गवंडी, सुकाजी मोरजकर, दिलीप परब, सागर धुरी, नकुळ परब, शशिकांत परब, रुपेश परब, प्रतीक्षा शेट्ये, शैलेश धुरी, बाबली मोरजकर, लाडू परब, श्रीराम जाधव, सुभाष परब, प्रशांत मेस्त्री आदीसह जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक, आरोग्य सहाय्य्क, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg