loader
Breaking News
Breaking News
Foto

भेडशी–बोडदे रस्त्यावर मोठमोठे खड्डे; गणेशोत्सवापूर्वी तातडीने दुरुस्तीची मागणी

तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील बोडदे गावाकडे जाणाऱ्या भेडशी–बोडदे रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे वाहन चालवताना खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून एस.टी. महामंडळाच्या गाड्यांचीही वाहतूक होत असल्याने खराब रस्त्याचा त्रास प्रवाशांनाही सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य महादेव शंकर गवस यांनी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यामुळे भेडशी ते बोडदे जाणारा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना अत्यंत त्रास होत आहे. तसेच या रस्त्यावरून एस.टी. महामंडळाच्या गाड्याही ये-जा करीत असल्याने खड्ड्यांमुळे त्यांनाही त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेता, रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

“रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी,” अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. बोडदे गावाकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग आता तातडीने दखल घेणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी न झाल्यास वाहनचालक आणि प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg