loader
Breaking News
Breaking News
Foto

सीएसएमटीहून पनवेलमार्गे कोकणासाठी दैनिक रेल्वेसेवेचा शुभारंभ; शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

पनवेल (प्रतिनिधी) :- मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) करण्यात आला. या नवीन रेल्वेसेवेमुळे मुंबई, नवी मुंबईसह कोकणातील प्रवाशांना नियमित प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे, डॉ.खा.श्रीकांत शिंदे व खा. नरेश म्हस्के यांनी केंद्रातील हि रेल्वे गाडी सुरु होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ट्रेन क्रमांक ०९००९ ही गाडी गुरुवारी सीएसएमटी येथून दुपारी १२.५० वाजता रवाना झाली. पनवेल स्थानकावर दुपारी २.२५ वाजता तिचे आगमन झाले. पनवेलमार्गे ही गाडी सावंतवाडी रोडच्या दिशेने रवाना झाली. नवीन दैनिक एक्स्प्रेस सुरू झाल्याने कोकण रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg