loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १० शिक्षकांची निवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून १० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाळेच्या विकासातील योगदानाची दखल घेत या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तालुकानिहाय निवड झालेल्या आदर्श शिक्षकांमध्ये मंडणगड तालुक्यातून निलेश तुळशीराम लोखंडे, उपशिक्षक, जि.प. मराठी शाळा तिडे आदिवासीवाडी; दापोली तालुक्यातून दिनेश कानू चिपटे, उपशिक्षक, जि.प. आदर्श शाळा भरणे कोंडारण; खेड तालुक्यातून दिप्ती दिलीप यादव, पदवीधर विषय शिक्षिका, जि.प. शाळा माणी नं. १; चिपळूण तालुक्यातून विनोद जानू हुंबरे, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा चिवेली वरची; तर गुहागर तालुक्यातून प्रभू रघुनाथ हबर्डे, उपशिक्षक, जि.प. आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी यांची निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच संगमेश्वर तालुक्यातून राजेश अर्जुन सावंत, पदवीधर शिक्षक, जि.प. आदर्श शाळा पूर; रत्नागिरी तालुक्यातून रश्मी राजन वाडेकर, उपशिक्षिका, जि.प. शाळा शिवार आबेरे नं. २; लांजा तालुक्यातून दिलीप शंकर चव्हाण, पदवीधर शिक्षक, जि.प. आदर्श पन्हळे नं. १; आणि राजापूर तालुक्यातून स्नेहा सुहास काडगे, उपशिक्षिका, जि.प. आदर्श शाळा पाथर्डे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय कला पुरस्कार (विशेष पुरस्कार) म्हणून संगमेश्वर तालुक्यातील संदेश प्रकाश झेपले, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा साडवली-सह्याद्रीनगर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून संबंधित शिक्षकांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या शैक्षणिक कार्याला मिळालेली ही दखल इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg