loader
Breaking News
Breaking News
Foto

वय अवघे १२ वर्षे... पण धाडस आभाळाएवढे! चिमुकल्या ऋतिक यादवचा दहीहंडी मैदानात धडाका; एक-दोन नव्हे तर तब्बल ९ हंड्या फोडत गाजवला पराक्रम!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- अंगात वयाच्या मानाने अफाट जिद्द, डोळ्यांत विजयाची चमक आणि मनात कोणतीही भीती नाही... अशा जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर अवघ्या १२ वर्षांच्या ऋतिक रविंद्र यादवने यंदाच्या दहीहंडी हंगामात थरारक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक-दोन नव्हे, तर तब्बल ९ हंड्या फोडत ऋतिकने आपल्या धाडसाचा आणि कौशल्याचा डंका वाजवला. आई सुखाई वरदायिनी महाकाली गोविंदा पथक, शिरगाव यंदाच्या हंगामात ९ हंड्या फोडून चर्चेत आले; मात्र या कामगिरीचा खरा नायक ठरला तो चिमुकला ऋतिक यादव.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोठमोठ्या मानवी मनोर्‍यांची उंची, गर्दीचा जल्लोष आणि हंडी फोडण्याचा वाढता दबाव... या सगळ्यांवर मात करत ऋतिकने दाखवलेली जिद्द अक्षरशः थक्क करणारी ठरली. पथकातील गोविंदांच्या खांद्यावरून वर चढत तो हंडीपर्यंत पोहोचला आणि अचूक लक्ष्य साधत हंडी फोडली की, खाली उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष सुरू होत होता. चिमुकला गोविंदा, पण पराक्रम मोठा!’ अशीच चर्चा यंदा ऋतिकच्या कामगिरीची रंगली. अवघ्या १२व्या वर्षी तब्बल ९ हंड्या फोडण्याची कामगिरी करत ऋतिकने आपल्या पथकाच्या यशात मोलाची भर घातली आहे.

टाइम्स स्पेशल

ऋतिकच्या या धाडसी कामगिरीमागे त्याचा नियमित सराव, पथकातील सहकार्‍यांचा विश्वास आणि हंडी फोडण्याची जिद्द महत्त्वाची ठरली. वयाने लहान असलेल्या या गोविंदाने आपल्या पराक्रमाने मात्र मोठमोठ्या गोविंदांचे लक्ष वेधून घेतले. यंदाच्या दहीहंडी हंगामात ९ हंड्या फोडणार्‍या आई सुखाई वरदायिनी महाकाली गोविंदा पथकाचा झेंडा उंचावला; पण त्या झेंड्याला खरी चमक दिली ती १२ वर्षांच्या ऋतिक यादवच्या धाडसी कामगिरीने. शिरगावच्या या चिमुकल्या गोविंदाच्या पराक्रमाची आता सर्वत्र कौतुकाने चर्चा होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg