loader
Breaking News
Breaking News
Foto

दिलकश काझी यांचे एम.एड. परीक्षेत स्पृहणीय यश

रत्नागिरी (जमीर खलफे) - गवळीवाडा परिसरातील रहिवासी इम्तियाज कासम काझी यांच्या स्नुषा दिलकश दानिश काझी यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथून एम.एड. पदवी परीक्षेत यश संपादन केले. या परीक्षेत त्यांनी विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकाविला. दिलकश यांनी रसायनशास्त्र या विषयात एम.एससी पदवी संपादन केली आहे. बी.एड , सी टीईटी व टीएआयटी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. दिलकश काझी या निवृत्त प्राध्यापक जलील हुश्ये यांच्या कन्या आहेत. उच्च शिक्षणाची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी एम.एड. पदवीचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg