loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड : भोस्ते घाटात खेड-चिपळूण बसला कंटेनरची धडक; प्रवासी सुखरूप

संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात बुधवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी खेड-चिपळूण बसला अपघात झाला. बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कंटेनरची धडक बसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बस खेडहून चिपळूणच्या दिशेने जात असताना भोस्ते घाटात कंटेनर चालकाने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg