loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर, शृंगारतळी येथील महिला स्वच्छतागृह व सांडपाण्याचे प्रश्न सोडवण्यात यावेत, जि. प. सदस्य प्रमोद गांधी यांची मागणी

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मांडले. त्यामध्ये प्रामुख्याने शृंगारतळी बाजारपेठेमध्ये महिला स्वच्छतागृह उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शृंगारतळी बाजारपेठेमध्ये आजूबाजूचा वीस ते पंचवीस गावातील लोक या ठिकाणी येतात. शृंगार तळी गावात मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे खरेदीसाठी दररोज हजारो लोक इथे येत असतात. पूर्वी या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आलेले होते. मात्र ते स्वच्छतागृह कालांतराने बंद पडले. त्यामुळे महिलांसाठी स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे शृंगारतळी गावामध्ये अनेक मोठ्या टोलेजंग इमारती उभे राहिले आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यापारी दुकाने व्यापारी संकुले उभी राहिली आहे. या सर्व इमारती मधले सांडपाणी गटारांमध्ये सोडले जाते. व गटारा मधून ते सगळे सांडपाणी नदी नाल्यांमध्ये सोडले जाते. याचा परिणाम म्हणून शृंगार तळी व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांच्या विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. या प्रदूषित विहिरीचे पाणी प्यायल्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी संकुले व इमारतींना सांडपाणी सोडण्याबाबत काहीतरी नियमावली तयार करून बिल्डर लोकांनाच इमारतींच्या सांडपाण्याची स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात यावे. विहिरी प्रदूषित झालेल्या असल्यामुळे सांडपाण्याच्या या प्रश्नावर जिल्हा परिषदेने अथवा संबंधित यंत्रणेने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg