संगलट (इक्बाल जमादार) - चिपळूण तालुक्यात आधुनिक वैद्यकीय उपचारांमध्ये औषधोपचारांसोबतच योग्य आहार आणि पोषण व्यवस्थापनाला दिवसेंदिवस अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. ही गरज ओळखून चिपळूण येथील अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आपल्या आहार व पोषण विभागाला अधिक बळकटी दिली असून, क्लिनिकल डायटिशियन व न्यूट्रिशनिस्ट Dt. जरीन दानिश शेख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. Dt. जरीन दानिश शेख यांनी Nutrition and Dietetics या विषयात पदवी प्राप्त केली असून, क्लिनिकल न्यूट्रिशन आणि आहार व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांना अनुभव आहे. वजन व्यवस्थापन, मधुमेह, PCOS/PCOD, थायरॉईड विकार, किडनी विकार, हृदयरोग तसेच बालक आणि गर्भवती महिलांसाठी आहार नियोजन या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष काम केले आहे.
प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज, आरोग्यस्थिती, आजाराचे स्वरूप, दैनंदिन जीवनशैली आणि आहाराच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सर्वांसाठी एकच आहारपद्धती न वापरता संबंधित व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन वैयक्तिकृत आहार आराखडा अर्थात Personalized Diet Plan तयार करण्यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे. योग्य आहार नियोजनासोबत जीवनशैलीविषयक समुपदेशन करून रुग्णांना दीर्घकालीन आणि शाश्वत आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. चिपळूण परिसरातील अनेक रुग्णांना त्यांनी यापूर्वीही आहार व पोषणविषयक मार्गदर्शन केले असून, शेकडो रुग्णांना आहार उपचार आणि पोषण समुपदेशनाचा लाभ मिळाला आहे. अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, फिजिओथेरपी यांसह विविध वैद्यकीय विभागांच्या सेवा उपलब्ध आहेत. रुग्णांना एकाच छताखाली सर्वसमावेशक आणि आधुनिक उपचार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हॉस्पिटलच्या उपचार व्यवस्थेत आहार व पोषण व्यवस्थापनाचा समावेश अधिक प्रभावीपणे करण्यात आला आहे.
विशेषतः मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, किडनीचे विकार, हार्मोनल समस्या तसेच विविध वैद्यकीय उपचारांदरम्यान योग्य आहाराचे नियोजन करण्यासाठी क्लिनिकल डायटिशियनची भूमिका महत्त्वाची ठरते. वैद्यकीय उपचारांना योग्य पोषणाची जोड मिळावी आणि रुग्णांच्या आरोग्य सुधारण्याच्या प्रक्रियेला मदत व्हावी, हा या विभागामागील प्रमुख उद्देश असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. Dt. जरीन दानिश शेख यांच्या नियुक्तीबद्दल अपरांत हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा चिपळूण शहरासह परिसरातील रुग्णांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. “योग्य उपचारांसोबत योग्य आहार, निरोगी जीवनाकडे एक महत्त्वाचे पाऊल” या दृष्टिकोनातून अपरांत हॉस्पिटलच्या आहार व पोषण विभागामार्फत आता रुग्णांना शास्त्रीय, वैयक्तिकृत आणि समग्र आहार मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.