loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकर्‍यांना सुखी-समृद्ध करण्यासाठी कृषी संशोधनाला चालना द्या ः भरतशेठ गोगावले

दापोली (चंद्रशेखर जोशी) : महाराष्ट्र राज्य देशात फळोत्पादनात प्रथम क्रमांकावर असून कृषी विद्यापीठांच्या संशोधन व विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतकरी सक्षम होत आहेत. शेतकर्‍यांना सुखी व समृद्ध करण्यासाठी कृषी संशोधनाला अधिक चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या तीन दिवसीय बैठकीचे उद्घाटन दापोली येथील विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात आज झाले. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना गोगावले बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खचे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी शर्मा, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg