loader
Breaking News
Breaking News
Foto

कसबा हायस्कूलचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९ वर्षे वयोगटात इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील कुमार सौरभ अनिल पांचाळ याने आपल्या बुद्धिचातुर्याचा उत्कृष्ट खेळ दाखवत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्याचे विशेष कौतुक होत आहे. याच गटात इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील कुमार आर्यन मनोज गुरव यानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाचवा क्रमांक मिळविला. दोन्ही खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कसबा हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

टाईम्स स्पेशल

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कॅ. अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी, उपाध्यक्ष इब्राहिम काझी, सचिव सईद उपाधे, सहसचिव शौकत अली खलफे, खजिनदार शिकूर गेबी यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तालुकास्तरीय स्पर्धेतील यशानंतर आगामी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हास्तरावरही दोन्ही खेळाडू चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg