वैभववाडी (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गुणवत्तेची पंखे देणाऱ्या आणि स्पर्धात्मक युगासाठी सक्षम करणाऱ्या मंथन व एक्सलंट ऑलिम्पियाड राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर २०२६ रोजी आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांच्या शुभहस्ते परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, बक्षीस व प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालक-शिक्षकांच्या डोळ्यांतील अभिमानाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांच्या वयाला, आवडी-निवडीला आणि भावविश्वाला साजेशा विविध प्रेरणादायी गोष्टी सांगत त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित केली. मंथन परीक्षेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले. नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन करत, “स्पर्धा परीक्षेचा हा प्रवाह केवळ काही विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता सामान्य आणि तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे,” असे आवाहन केले. ग्रामीण भागातील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला संधी मिळावी यासाठी स्वतःही प्रयत्न करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धात्मक परीक्षांची गरज अधोरेखित करत, महाविद्यालयामार्फत इयत्ता नववी, दहावी तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही अशा परीक्षा आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी खालील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यामंदिर कोकिसरे नारकरवाडी चे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी - सानवी शशिकांत रावराणे, अजिंक्य जानू पाटील, सुबोध सुभाष खुळपे, अगस्त्य माणिक चौगुले, आरोही रणजीत सावंत, श्राव्या सुरज पाटील, कुमार विद्यामंदिर कोकिसरे खांबळवाडी चे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी - ईशा समीर सरवणकर, अर्णव विजय बेळेकर, अथर्व नारायण सुलेभावी.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे चे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी - यशार्थ विनायक मेनये, इंद्रनील अमोल येणगे. श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर तिथवली नंबर १ चे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी - अर्णवी सचिन झाटे, स्वरा बाळकृष्ण किनेकर, रोझाण गुलजार काझी. विद्या मंदिर करूळ गावठाण 'अ' चा पारितोषिक प्राप्त विद्यार्थी - देविका समीर घाडी. दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर १ चा विद्यार्थी शार्विल धनराज हत्तुरे. अचिर्णे सिद्धाचीवाडी या शाळेचा विद्यार्थी हर्षद दीपक घाटये. विद्या मंदिर निमअरुळे चा विद्यार्थी अर्णव महेश इस्वलकर. माधवराव विद्यामंदिर कोकिसरे चा विद्यार्थी अंश संजय आडे. विद्यामंदिर अखवणे नंबर १ चा विद्यार्थी समर्थ संदीप गोरे. रामेश्वर विद्या मंदिर एडगाव नंबर १ चा विद्यार्थी धैर्य चेतन बोडेकर. विद्यामंदिर गडमट तेलीवाडी चा विद्यार्थी सानवी नारायण दळवी. केंद्र शाळा नाधवडे चा विद्यार्थी कौशिकी देवदास करंबळकर. विद्यामंदिर कुसुर नंबर १ चा विद्यार्थी विराज राजेंद्र पाटील. जीवन शिक्षण विद्यामंदिर केंद्र शाळा फोंडा नंबर १ चा विद्यार्थी समर्थ समाधान वाघमोडे. श्री मनुबाई विद्यामंदिर वायंबोशी मल्हार अजय शेळके.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन मंथन व एक्सलंट ऑलिम्पियाड शिष्यवृत्ती परीक्षा समन्वयक स्वप्नाली दिघे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन प्राध्यापिका संजीवनी पाटील यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने करत कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाला विशेष उंची प्राप्त करून दिली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शिक्षकांच्या कर्तृत्वाची दखल आणि पालकांच्या त्यागाला मिळालेली कौतुकाची थाप, या त्रिवेणी संगमाने शिक्षक दिनाचा हा सोहळा अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या यशाला नवी दिशा देणारा आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणारा हा उपक्रम भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांच्या यशोगाथांना जन्म देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.