दापोली (वार्ताहर ) : कोकणच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची आणि पारंपरिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे रामराजे महाविद्यालयाच्या वतीने कोकणात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांपासून तयार केलेल्या नाविन्यपूर्ण पाककृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बुधवार, दि. ८ सप्टेंबर २०२७ रोजी सकाळी ११.०० वाजता रामराजे महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या भारंगी, टाकळा, कुरडू, करटोली, चिचार्डी, प्याव, दार, शतावरी, ई. आदी रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण आणि चविष्ट पाककृती मांडण्यात येणार आहेत.
या रानभाज्यांचे पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्व, त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे तसेच आरोग्यास होणारे विविध फायदे याबाबतची माहितीही प्रदर्शनामध्ये आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचा आहारातील वापर आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ‘नानीचो वाडो ’ कृषी पर्यटन संस्थेचे स्मितेश तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.संदीप राजपुरे, तालुका कृषी अधिकारी दापोली हेमंत ठोंबरे, संस्थेच्या अध्यक्ष स्मिताली राजपुरे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कोकणच्या मातीत रुजलेल्या या पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक पाककलेची जोड देत तयार करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तसेच रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व जाणून घेण्यासाठी दापोलीकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन रामराजे महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.