loader
Breaking News
Breaking News
Foto

शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे विद्यार्थी - शिक्षक दिन उत्साहात साजरा!

देवगड (प्रतिनिधी) - शेठ म. ग. हायस्कूल देवगड येथे ५ सप्टेंबर २०२६, 'डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन' यांची जयंती सर्व 'शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी' यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम 'डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 'यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समिती मधील सहाय्यक शिक्षक शामू जंगले यांनी 'डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन' यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच 'ओवी बापट' इ. ९वी -ड, हिने विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. 'शिक्षक दिनाचे' औचित्य साधून सोमवार दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी आमच्या शेठ म.ग. हायस्कूल, देवगड येथील इयत्ता दहावीच्या 'विद्यार्थी - विद्यार्थिनींनी' 'विद्यार्थी शिक्षक -दिन' शालेय वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी एकूण ६० विदयार्थी सहभागी झाले. आजच्या दिवसाची सुरुवात 'राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रार्थना' घेऊन करण्यात आली. 'अधिराज बलवान' यांनी 'मुख्याध्यापक' म्हणून व 'पर्यवेक्षिका 'म्हणून स्नेहा नागरगोजे' यांनी आजच्या दिवसाच्या कामकाजाची धुरा स्वीकारून आजचा 'विद्यार्थी- शिक्षक' दिन उत्साहात संपन्न केला. 'शिक्षकेतर- कर्मचारी' म्हणून ' सानिका तारी, सर्वेश कोयंडे व मंथन मेस्त्री' यांनी कामकाज पाहिले. या कार्यक्रमास 'संस्था पदाधिकारी', 'शालेय समितीचे अध्यक्ष' चंद्रकांत शिंगाडे ' यांनी भेट देऊन विदयार्थी - शिक्षकांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थी -शिक्षकांनी मोठ्या उत्साहात प्रत्येक वर्गावर प्रत्यक्ष अध्यापन करून आजच्या दिवसाचा आनंद व अध्यापनाचा अनुभव घेतला. शेवटी 'वंदे मातरम' म्हणून शाळेचे कामकाज पूर्ण करण्यात येऊन शाळा सोडण्यात आली.

टाईम्स स्पेशल

सर्व 'विद्यार्थी -शिक्षकांनी' शालेय वेळेनंतर स्वतःचे आजच्या दिवसाचे अनुभव कथन केले. आजच्या दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन, समिती सदस्य संतोष चव्हाण, शामू जंगले, रश्मी ठाकूर व आफ्रिन पठाण यांनी, मुख्याध्यापक प्रविण खडपकर पर्यवेक्षिका निशा दहिबांवकर, तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्तम रित्या पार पाडले. सदरील कार्यक्रम तसेच विदयार्थी -शिक्षकांचे संस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक, पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg