loader
Breaking News
Breaking News
Foto

दिलकश दानिश काझी यांचे एमएड परीक्षेत स्पृहणीय यश

रत्नागिरी, (वार्ताहर): गवळीवाडा परिसरातील रहिवासी इम्तियाज कासम काझी यांची सून दिलकश दानिश काझी यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथून एम. एड. (शैक्षणिक वर्ष २०२४-२६) पदवी परीक्षेत स्पृहणीय यश संपादन करुन विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. दिलकश यांनी रसायनशास्त्रात एम. एस्सी. तसेच बी. एड. सीईटी व टीएआयटी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. दिलकश काझी या निवृत्त प्राध्यापक जलील हुश्ये यांच्या कन्या आहेत. उच्च शिक्षणाची जिद्द सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी एम. एड. पदवीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल सासरे इम्तियाज काझी, वडील जलील हुश्ये, कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg