loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वेळणेश्वर विद्यालयाचे सुयश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पाचेरी आगर, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वेळणेश्वर विद्यालयातील १४ वर्षांखालील वयोगटामध्ये कुमार गोरक्ष विलास पेडणेकर व कुमारी आरोही दत्तात्रय वावरे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील सुमारे १० विद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये कुमारी आरोही दत्तात्रय वावरे हिने आपल्या बुद्धिबळ खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली. तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg