देवगड (प्रतिनिधी) - देवगड समुद्रकिनारी सागरी हद्दीचे नियम तोडून पर्शियन नौकामालक बेसुमार मच्छिमारी करत असून पारंपरिक मच्छीमारांचे हक्क हिरावले जात आहेत. त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा त्याविरोधात आम्हाला तीव्र लढा उभारावा लागेल, असा इशारा बिगर यांत्रिकी रापण संघ, देवगड यांच्या वतीने देण्यात आला. मत्स्यव्यवसाय खात्याचे देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांची तालुक्यातील रापण संघाच्या शिष्ट मंडळाने आज भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. देवगड परिसरातील पारंपरिक मच्छीमार गेल्या अनेक वर्षांपासून रापण पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या व्यवसायावर अनेक मच्छीमार कुटुंबांसह स्थानिक कामगारांचेही जीवन अवलंबून आहे.
मात्र, सध्या विजयदुर्ग ते मुगणे हद्दीत मिनी पर्ससीन नेट तसेच पर्ससीन नेटच्या माध्यमातून होणार्या मासेमारीमुळे पारंपरिक रापण मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर होणार्या या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात येणार्या माशांचे प्रमाण कमी झाले असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. त्यामुळे संबंधित हद्दीत नियमबाह्य अथवा प्रतिबंधित पद्धतीने होणार्या मिनी पर्ससीन नेट व पर्ससीन नेट मासेमारीची तात्काळ पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. तसेच रापण संघाच्या हद्दीत नियमित गस्त व तपासणी करून पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी पारंपरिक मच्छीमारांनी, बेकायदेशीर मासेमारीवर तातडीने कारवाई न झाल्यास कायदा हातात घेण्याची वेळ येईल, असा इशारा प्रशासनाला दिला. दरम्यान, परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्यांची दखल घेत, त्यांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर मासेमारी होऊ नये यासाठी विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही व नियमित तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी विश्वास भुजबळ, सुमंत वाडेकर, दिनेश धुवाळी, संतोष लब्दे, प्रशांत शिंदे, लक्ष्मण जोईल, अशोक पेडणेकर, शशिकांत लब्दे, अनिल जोईल यांच्यासह कुणकेश्वर, कातवण, पडवणे, विजयदुर्ग या गावाचे रापण संघाचे पदाधिकारी व पारंपरिक मच्छीमार बांधव उपस्थित होते.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.