loader
Breaking News
Breaking News
Foto

अजिंक्य पोक्षे यांना डॉ. श्रीरंग आडरकर पुरस्कृत नाट्य संगीत कलाकार पुरस्कार प्रदान

देवरुख सुरेश सप्रे : संगमेश्वर तालुक्यातील पोंक्षे आंबव-आरवलीत येथील गायक-नट म्हणून नावलौकिक मिळवणारे अजिंक्य पोक्षे यांना मानाचा समजला जाणारा डॉ. श्रीरंग आडरकर पुरस्कृत नाट्य संगीत कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अ. ना. परांजपे यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे नाट्यगौरव पुरस्कार सोहळा आणि रसिकांसाठी खास स्मरण गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार अजिंक्य यांना प्रदान करण्यात आला .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अजिंक्य पोक्षे यांनी संगीतात प्रसाद गुळवणी,वकील कविता गाडगीळ, सतीश कुंटे यांच्याकडून शिक्षण घेतले आहे. नाट्यसंगीतातील गुरु मकरंद कुंडले, विलास आरसे यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली आहे. संगीत राज्यनाट्य स्पर्धेत संगीत प्रीतीसंगम, संगीत ताजमहाल या नाटकांसाठी त्यांना रौप्य पदके मिळाली आहेत. अलीकडे संयुक्त आणि बोलविता धनी या नाटकातील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. अजिंक्य हे तालुक्यातील प्रसिद्ध गायक कै. दिपक पोंक्षे यांचे सुपुत्र आहेत.. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg