loader
Breaking News
Breaking News
Foto

'श्रीराम भटवाडी' जामसंडेला मिळाला 'इंद्रधनू'च्या दहीहंडीचा मान!

देवगड (प्रतिनिधी) : इंद्रधनू - देवगड आयोजित व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवातील मानाची दहीहंडी जामसंडेच्या श्रीराम भटवाडी गोविंदा पथकाने फोडून रोख ११ हजार १११ रूपयांचे बक्षीस पटकाविले. सलग पाचव्या वर्षी या पथकाला मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. या पथकाला इंद्रधनू- देवगड संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यासपीठावर न. पं. पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, सौ. जान्हवी गोसावी, भाजपच्या तन्वी शिंदे, इंद्रधनू संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, सदस्य मिलिंद मोर्ये, आनंद रामाणे, राजीव पडवळ, यतीन कुळकर्णी, अमोल वंजारे, किरण कांबळी, वैभव केळकर, भावेश पटेल, प्रशांत पटेल, अनुसया कॉम्प्लेक्सचे सोहम पारकर, व्यापारी भाई नाडणकर, आपला बाजाराचे व्यवस्थापक श्री. पाटील आदी उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या दहिहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे रचून सलामी दिली.

टाईम्स स्पेशल

श्रीराम भटवाडी गोविंदा पथक- जामसंडे, दिर्बा रामेश्वर गोविंदा पथक- जामसंडे आझादनगर, शुभम स्पोर्ट्स महिला गोविंदा पथक- जामसंडे आझादनगर यांनी उत्सवात रंगत आणली. सात थरांची सलामी देण्यासाठी श्रीराम भटवाडी गोविंदा पथक व दिर्बा रामेश्वर गोविंदा पथकात मोठी चुरस पाहायला मिळाली. या दोन्ही पथकांच्या चित्तथरारक मानवी मनोऱ्यांना उपस्थित रसिकांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली. शुभम स्पोर्ट्स महिला गोविंदा पथकाने कलाविष्कार सादर करून रसिकांची मने जिंकली. सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकांना रोख बक्षीसे देण्यात आली. या दहीहंडी उत्सवाला अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी वर्गाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रशांत वाडेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg